Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके

Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके

0
Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके
Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके

Nilesh Lanke : श्रीगोंदा : लोकांनी मोठ्या अपेक्षेने विजयी केले, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अनेकांनी नवस केले. हे भाग्य मला लाभले. माझ्या कातड्याचे जोडे करून लोकांना दिले, तरी यातून उतराई होऊ शकत नाही. ज्या हेतूने मतदान (Voting) केले, तो हेतू तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शब्द नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील येळपणे जिल्हा परिषद गटातील सत्कार सोहळ्यात बोलताना दिला.

नक्की वाचा: फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी

खासदार निलेश लंके यांचा सत्कार तसेच ग्रंथतुला

येळपणे गटातील देवदैठण येथे ग्रामस्थांच्या वतीने खासदार निलेश लंके यांचा सत्कार तसेच ग्रंथतुला करण्यात आली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के होते.

अवश्य वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके

खासदार लंके म्हणाले, (Nilesh Lanke)

श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने जे मताधिक्य दिले त्यातून उतराई होणे शक्य नाही. रस्ते, पाणी, वीज, शेतमालाला भाव यासाठी तसेच वैयक्तिक योजना ही सर्व कामे पूर्ण करणार आहे.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, मतदारसंघातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. अनेक कामे अपूर्ण आहेत .सगळीकडे दर्जाहिन कामे सुरू आहेत. आता यापुढे विकासात्मक बदल घडवण्याची गरज आहे. देवदैठण येथे माझ्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले तेथे डॉक्टर आणि स्टाफ नाही, हे चित्र बदलण्यासाठी खासदार लंके यांनी आचारसंहिता संपल्यावर लक्ष घालावे.

Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके
Nilesh Lanke : कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी उतराई होणार नाही: खासदार लंके

प्रास्ताविकात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांनी पारनेर आई तर श्रीगोंदा मावशी समजून तालुक्यातील प्रश्न सोडवण्याचे साकडे खासदार लंके यांना घातले. यावेळी दैवदैठण तसेच पंच क्रोषितील ग्रामस्थांनी सत्कार केला. तसेच खासादर लंके यांचे निकवर्तीय हिंगणी गावचे सरपंच संदीप तरटे यांनी खासदार लंके यांच्या वजनाइतके ग्रंथतुला करून ग्रंथ वितरीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे, तालुका दूध संघ माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे, अमोल वाघमारे, विजय कोकाटे, सुभाष वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

सर्जेराव कौठाळे, भाऊसाहेब जाधव, वैजनाथ वाघमारे आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here