Nilesh Lanke : नगर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना अहमदनगर लाेकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंगळवार (ता. २५) इंग्रजीत (English) घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरली आहे.
अवश्य वाचा : सावधान!कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार बरसणार
नीलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे-पाटील घराण्याचे नाव मोठे असल्याने सुजय विखेंचा पराभव करुन नीलेश लंके हे एका अर्थाने जायंट किलर ठरले होते. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी नीलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले होते.
नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश
संसदेत इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन उत्तर (Nilesh Lanke)
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी नीलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असे सुजय विखेंनी म्हटले होते. सुजय विखे यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले होते. मात्र, नीलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर नीलेश लंके यांनी दिले होते. मात्र, आता संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन नीलेश लंके यांनी विखे-पाटील यांना एकप्रकारे उत्तर दिले आहे.