Nilwande Dam : निळवंडे धरणातून सिंचनासाठी आवर्तन सुरू

Nilwande Dam : निळवंडे धरणातून सिंचनासाठी आवर्तन सुरू

0
Nilwande Dam : निळवंडे धरणातून सिंचनासाठी आवर्तन सुरू
Nilwande Dam : निळवंडे धरणातून सिंचनासाठी आवर्तन सुरू

Nilwande Dam : अकोले : निळवंडे धरणातून (Nilwande Dam) उन्हाळी हंगामातील सिंचनासाठीचे (Irrigation) पहिले आवर्तन सोमवारी (ता.७) सोडण्यात आले. १६०० क्युसेक्सने डाव्या उच्चस्तरीय कालव्यातून सकाळी ७ वाजता प्रवरा नदीपात्रात (Pravara River) विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हे आवर्तन २५ ते २८ दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस

धरणांमध्ये चांगल्याप्रकारे पाणी उपलब्ध

यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. निळवंडे, भंडारदर्‍यासह सर्व जलाशये वेळेत भरले. त्यानंतरही पाऊस सुरू राहिल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरण भरल्यामुळे यावर्षी निळवंडे भंडारदरा धरणातून पाणी सोडावे लागले नाही. तसेच लाभक्षेत्रातही चांगला पाऊस पडला, त्यामुळे उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला दोन्ही धरणांमध्ये चांगल्याप्रकारे पाणी उपलब्ध आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी भंडारदरा धरणात ६९३४ दलघफू (६२.८१ टक्के) तर निळवंडे धरणात ३३३३ दलघफू (४० टक्के) पाणी शिल्लक होते. दोन्ही धरणांमध्ये मिळून सुमारे दहा टीएमसी पाणी सिंचनासाठी शिल्लक आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार

मात्र, या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे (Nilwande Dam)

भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी ७५२ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कोदणी येथील वीज प्रकल्पही सुरू झाला आहे.त्यामधून आज सकाळी २३७५ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असले तरी निळवंडेच्या कालव्यातून पाणी सोडलेले नाही. मात्र, उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा धरणातही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. १०६० दलघफू क्षमतेच्या या धरणात सोमवारी सकाळी ६७९ दलघफू (६४.०६ टक्के) पाणी शिल्लक होते. दरम्यान, विविध धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता योग्य नियोजन झाल्यास यंदा लाभक्षेत्राला पाणी टंचाई जाणवणार नाही, असे दिसते.