Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात

Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात

0

Nimaj Biroba Temple : संगमनेर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निमज गावात श्री बिरोबा महाराज मंदिराच्या (Nimaj Biroba Temple) कलशारोहण सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. “बिरोबाच्या मंदिरात आल्यावर त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) आल्याचा भास होतो,” असे प्रतिपादन श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज (Swami Shivgiri Maharaj) यांनी केले. त्यांच्या हस्ते पार पडलेला हा सोहळा गावकऱ्यांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात
Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण गाव गेले भारावून

भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री बिरोबा महाराजांविषयी माहिती देताना स्वामी शिवगिरी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. मंदिराचा जीर्णोद्धार काही अडचणींमुळे रखडला होता; मात्र आता हेमाडपंथी शैलीतील भव्य बांधकाम पूर्णत्वास जाऊन कलशारोहण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण गाव भारावून गेले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

“नवसाला पावणारे देव” म्हणून ख्याती (Nimaj Biroba Temple)

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व नागरिक, स्त्री-पुरुष एकत्र येत भक्तिभावाने पूजा करतात. बिरोबा महाराज हे गावाचे कुलदैवत मानले जात असून “नवसाला पावणारे देव” म्हणून त्यांची ख्याती आहे.

Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात
Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात

यात्रेनिमित्त प्रत्येक घरातून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. महिलांकडून फुले, हार, गुळाची शेरणी अर्पण करून ती संपूर्ण गावात वाटली जाते. सकाळी आठ वाजता बिरोबा महाराजांची काठी प्रवरा नदीवर नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने स्नान घालण्यात येते. त्यानंतर काठीला वस्त्र परिधान करून पूजा-आरती केली जाते. घंटा व डफ यांच्या गजरात काठी नाचवली जाते आणि त्यानंतर मूर्तीचा अभिषेक व सजावट केली जाते.

Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात
Nimaj Biroba Temple : डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा; निमजमध्ये श्री बिरोबा महाराज मंदिरावर कलशारोहण उत्साहात

दिवसभर भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. संध्याकाळी काठ्यांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येते. ठिकठिकाणी महिला काठीची पूजा करून वाद्यांच्या गजरात नाचत सहभागी होतात. मिरवणूक पुन्हा मंदिरात आल्यानंतर रात्रभर भजन, वाण-गायनाचे कार्यक्रम रंगतात, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने लागली होती, ज्यामुळे लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरले. गावातील विविध समाजघटकांनी एकत्र येत हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

दरम्यान, यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कलशारोहण सोहळ्यासाठी गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या सोहळ्यामुळे निमज गावात उत्साह, एकोप्याचे आणि भक्तीचे अनोखे दर्शन घडले.