Union Budget 2024: करदात्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा;करामध्ये ‘इतक्या’लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना कररचनेत काय बदल होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते.

0
Union Budget 2024: करदात्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा;करामध्ये ‘इतक्या’लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही
Union Budget 2024: करदात्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा;करामध्ये ‘इतक्या’लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

Union Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना कररचनेत काय बदल होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. त्यात आता अपेक्षेप्रमाणे दिलासा देण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीत (Income Tax) स्टँडर्ड डिडक्शन हे ५० हजारांवरुन ७५ हजार करण्यात आलं आहे. निर्मला सीतारमण यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा : अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

‘३ लाखापर्यंतच्या उत्पनावर कुठलाही कर नाही’ (Union Budget 2024)

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की,“विकसित भारतासाठी आमची पहिली प्राथमिकता कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे. दुसरं प्राधान्य म्हणजे, रोजगार आणि कौशल्य. तिसरं प्राधान्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय आहे, चौथं प्राधान्य उत्पादन आणि सेवा आहे. पाचवं प्राधान्य शहरी विकासाला चालना देणं हे आहे. सहावं प्राधान्य ऊर्जा सुरक्षा आहे. सातवं प्राधान्य म्हणजे, पायाभूत सुविधा, त्यानंतर आठवं प्राधान्य नवकल्पना, संशोधन आणि विकास असून नववं प्राधान्य म्हणजे, पुढच्या पिढीतील सुधारणा. या प्राधान्यांच्या आधारे आगामी अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे” असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या शेवटी त्यांनी कर प्रणाली जाहीर केली. ज्यानुसार ३ लाखापर्यंतच्या उत्पनावर कुठलाही कर लागणार नाही.

अवश्य वाचा : मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार

नवी करप्रणाली (वार्षिक उत्पन्नानुसार) (Union Budget 2024)

०-३ लाख- कुठला कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

सामान्य नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स स्लॅबविषयी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. जुन्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र,नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे १७५०० रुपये वाचणार आहेत. मात्र करप्रणालीतील हे बदल करदात्यांच्या पचनी पडणार का, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here