Nitesh Rane : नगर : अकोला जिल्ह्यात रविवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसां (Police) बाबत वादग्रस्त वक्तव्य केले की; पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?
हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा
चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील
आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, “माझे कोणी काहीही करू शकत नाही. पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?”.
नक्की वाचा: शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध’: एकनाथ शिंदे
राणेंच्या विधानावरून चौफेर टीका (Nitesh Rane)
सर्वत्र अतिक्रमण केले जात आहे. राजरोसपणे हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला. हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, नितेश राणेंच्या विधानावरून आता चौफेर टीका होत आहे.