Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे

Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे 

0
Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे 
Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे 

Nitesh Rane : श्रीरामपूर : महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) काय चुकीचे बोलले हे समजत नाही. मुस्लिम समाजातील बुद्धिवादी लोकांनी सांगावे की ते जे बोलले ते चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्यावर एवढं रान माजविण्याचे काहीच कारण नाही. महाराजांना सोशल मीडियावरून धमक्या दिल्या जात आहेत. रामगिरी महाराज यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यांना कुणालाही सोडणार नाही, असा इशारा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

रॅलीनंतर शहरात झाली जाहीर सभा

सकल हिंदू समाज, राष्ट्रीय श्रीराम संघ, सकल वारकरी संप्रदायतर्फे मंहत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्याविरोधात समर्थन रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर शहरात झालेल्या जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, नवनाथ महाराज म्हस्के, कृष्णानंद महाराज, रंजाळे महाराज, गणेश महाराज आदींसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

आमदार नितेश राणे म्हणाले की, (Nitesh Rane)

हिंदुंवर बांग्लादेश व पाकिस्तानात एवढे अत्याचार होत असतील तर आपल्या देशात यांचे लाड का करायचे? हिंदू भगिनींवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत. रामगिरींकडे वाकड्या नजरेने पाहिले तर एकालाही सोडणार नाही. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही ते चांगलेच केले. सर्वधर्म समभाव फक्त आम्हीच पाळायचा का? भाईचाऱ्याची टेप सारखी सारखी आमच्यापुढे नका वाजवू. ते त्यांची जनसंख्या वाढवण्याचे षड्यंत्र रचत आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद चे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. पोलिसांनीही त्यांच्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालावी. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. श्रीरामपूरात अवघ्या १३ वर्षांच्या मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे निंदनीय आहे. रामगिरींच्या आडून हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. राज्यात गो हत्या बंदी कायदा असतानाही येथे कत्तलखाने बेफामपणे सुरू आहेत, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे 
Nitesh Rane : रामगिरींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नितेश राणे 

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग म्हणाले की, राज्यातल्या अनेक लव्ह जिहादच्या घटना आमदार राणे यांनी उघडकीस आणून विधानसभेत त्या बाबत प्रश्न मांडले. रामगिरी महाराज यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र, झाकीर नाईकवर असे गुन्हे दाखल का केले नाही. रामगिरी महाराजांना थोडा जरी त्रास झाला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही बेग यांनी दिला. यावेळी नवनाथ म्हस्के महाराज यांचेही भाषण झाले.