
नगर : काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत तर आपण लाबून हसणं बरोबर आहे,अशा शेलक्या शब्दात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) निशाणा साधला आहे. मविआत राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेण्याच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध केला असून मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या काँग्रेसच्या (Congress) भूमिकेवर मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) टीका केली आहे.
नक्की वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ आणि मुरूम
काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर मुंबईत त्यांनी स्वबळावर निवडणुका घ्याव्यात – नितेश राणे (Nitesh Rane)
काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर मुंबईत त्यांनी स्वबळावर निवडणुका लावून दाखवावे. ते नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार वेगळं, वर्षा गायकवाड वेगळं बोलणार, तर तिकडे अस्लम शेख वेगळं बोलणार. मात्र हे सगळं मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी कार्यक्रम आहेत. काँग्रेसची भाषा ही जिह्याद्यांची भाषा आहे. त्यामुळे काँग्रेसवर मुंबईसह, राज्यात, देशात कुणाचाही विश्वास राहिला नाही,अशी बोचरी टीकाही मंत्री नितेश राणेंनी यावेळी केली. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते.
अवश्य वाचा: मी कट्टर बीजेपी;अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात वक्तव्य
राहुल गांधी अर्धवेळ राजकारणी -नितेश राणे (Nitesh Rane)
जनतेशी नाळ नसलेले आणि देशासाठी पर्यटक असलेले, देशाची बदनामी करतात आणि पुन्हा परदेशात जातात. अर्धवेळ राजकारणी आहेत. १०० टक्के भारतीय म्हणायचे का हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारलं, अशी टीका करत मंत्री नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. एका बाजूला वोट चोरीची बोंब आणि दुसरीकडे लोकशाहीची थट्टा करायची, ही राहुल गांधींची सवय झाली आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बिहारच नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. असेही ते म्हणाले.


