Nitin Chandanshive : पारनेर : पारनेर (Parner) येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये (New Arts, Commerce, and Science College) ग्रंथालय आणि मराठी विभागाच्या वतीने ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी नितीन चंदनशिवे (Nitin Chandanshive) उपस्थित होते.
नक्की वाचा : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात
नितीन चंदनशिवे म्हणाले की
कवी, दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात साहित्य आणि समाज या विषयावर व्यक्त होताना म्हणाले की, प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ओळख निर्माण करता यावी. कवीच्या कविता या फक्त मनोरंजनासाठी नाहीत तर त्या समाजात बदल घडवण्यासाठी आहेत. परिवर्तनाचे विचार समाजात रुजवणाऱ्या गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत तुकारामांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे. नेहमी भारतीय म्हणून जगा असा बहुमोल संदेश त्यांनी आपल्या विवेचनातून दिला.
अवश्य वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
स्वतःच्या निरीक्षणातूनच आपल्यातील कमतरता दूर होतात (Nitin Chandanshive)
विशेष म्हणजे, शुभम घुंगार्डे यांची ‘लेफ्टनंट क्लासवन अधिकारी’ पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शुभम यांनी आपल्या आवडीनिवडी व स्वतःच्या निरीक्षणातूनच आपल्यातील कमतरता दूर होतात. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढीस लागण्यासाठी सदैव प्रयत्न करावेत. असे मत व्यक्त करून त्यांनी आपला यशस्वी प्रवास सांगितला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची ओढ निर्माण होते. माणूस म्हणून जगण्यासाठी साहित्यिकांनी दिलेला विचार, भूमिका प्रत्येक समाजातील घटकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित
मराठी विभाग प्रमुख डॉ. हरेश शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. माया लहारे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख, मराठी विभागातील डॉ. नंदकुमार उदार, डॉ. प्रवीण जाधव, ग्रंथालय कर्मचारी श्री. नामदेव ठाणगे, ज्योती पतके, नंदिनी चव्हाण, दत्ता पळसकर तसेच सर्व प्राध्यापक वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



