Nitin Gadkari : उद्योजक-व्यापारी रोजगार निर्मिती करणारे – नितीन गडकरी

Nitin Gadkari : उद्योजक-व्यापारी रोजगार निर्मिती करणारे - नितीन गडकरी

0
Nitin Gadkari

Nitin Gadkari : नगर : अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने (AHMEDNAGAR MERCHANT CO-OPERATIVE BANK) व्यावसायिक व उद्योजकांसह सर्वसामान्यांना पतपुरवठा केला. उद्योजक-व्यापारी रोजगार निर्मिती करणारे आहेत. ते अनेकांच्या हाताला काम देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत घडविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार रोजगार निर्मिती करणारी अर्थव्यवस्था तयार करायची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

हे देखील वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

हस्तिमल मुनोत यांना सहकार यात्री उपाधी देऊन गौरव (Nitin Gadkari)


नगरमधील मार्केट यार्डमध्ये असलेल्या अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारोह प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत, आमदार राम शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बँकेचे संचालक अनिल पोखरणा, अमित मुथा, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, किशोर मुनोत आदींसह बँकेचे संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. यावे्ळी हस्तिमल मुनोत यांना सहकार यात्री उपाधी देऊन गौरविण्यात आले. तसेच हस्तिमलजी मुनोत को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.

नक्की वाचा: आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

देशात इथेनॉलचा वापर वाहनांसह जेट विमानांतही (Nitin Gadkari)


नितीन गडकरी म्हणाले, बँकेचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत हे गांधीवादी विचारांचे आहेत. महात्मा गांधी म्हणाले होते की, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे. त्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून सकल उत्पन्न वाढविण्याचे काम सुरू आहे. देशात इथेनॉलचा वापर वाहनांसह जेट विमानांतही होऊ लागला आहे. इंडियन ऑइल कंपनी देशात ४०० इथेनॉलचे पेट्रोल पंप टाकणार आहे. त्यातून शेतकरी समृद्ध करण्यात येणार आहे. शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जा दाता झाला आहे. हायड्रोजनवर कारखाने, वाहने चालतील. देश लवकर ऊर्जा निर्यात करणारा देश ठरेल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here