Nitin Gadkari : नगर : गेल्या ४० वर्षांपासून पारख परिवाराने आपले कॅमल साबुदाणा (Camel Sago) हे उत्पादन प्रत्येक घराघरांत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. याचीच फलश्रुती म्हणून त्यांना नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या जॅग्वार ग्रुप व प्रसिद्ध रेडिओ ऑरेंज आयोजित ऑरेंज बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा एफएमसीजी (FMCG) विश्वसनीय ब्रँड म्हणून केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला.
अवश्य वाचा : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा अट्टाहास
कॅमल साबुदाण्याचे संचालक अशोक बन्सीलाल पारख यांनी हा सन्मान स्वीकारला. आपले कष्ट व ग्राहकांनी कॅमल साबुदाणा या आमच्या उत्पादनावर दाखविलेला विश्वास यांचीच ही फलश्रुती आहे, असे पारख यांनी सांगितले. स्वच्छ, शुभ्र, निवडक व दाणेदार ‘कॅमल साबुदाणा’ ग्राहकांना देण्यासाठी अशोक पारख यांचा नेहमीच भर असताे. उपवास म्हणजे देवाची आराधना आणि भक्तीचा संबध असतो. त्यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. आपल्याद्वारे ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्याचा त्याचा अट्टाहास असतो.
नक्की वाचा : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी
अनेक पदार्थांसाठी कॅमल साबुदाण्याचीच निवड (Nitin Gadkari)
आपल्या उत्पादनात सर्वोत्तम देण्याच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी आपल्या उत्पादनात बदल केले. इन्स्टंट साबुदाणा या उत्पादनाद्वारे ग्राहकांच्या वेळेतही बचत झाली. त्यांना कधीही, केव्हाही साबुदाणा खाणे शक्य झाले. त्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार १ किलो, ५०० ग्रॅम, २५० ग्रॅम पॅकिंगमध्ये आपले उत्पादने सर्व किराणा दुकानांमध्ये सहज मिळेल, अशी वितरण व्यवस्था कार्यान्वित केली. घरातील गृहिणी देखील खिचडी, साबुदाणा वडा बनविण्यासाठी कॅमल साबुदाण्याचे पसंती देतात. त्याचबरोबर वर्षभर उपवासासाठी करण्यात येणारे साबुदाणा पापड व इतर अनेक पदार्थांसाठी कॅमल साबुदाण्याचीच निवड करतात.
आज सर्व सामान्यांच्या मनात कॅमल साबुदाण्याविषयी विश्वास आणि प्रेम तर आहेच, शिवाय साबुदाणा खाण्यासाठी देखील ग्राहक वेगवेगळी कारणे शोधत असतात. ही बाब आमच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद आहे व याच गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्याच्या उत्पादनांची टॅग लाईन देखील तशीच ठेवली आहे. उपवासाची कारणे अनेक, साबुदाणा मात्र एक…
कॅमल साबुदाणा हा महाराष्ट्रासह परराज्यातही खूप लोकप्रिय आहे. या ब्रॅंडला या उंचीवर घेऊन जाण्यास अशोक पारख यांची मुले अभय पारख व अतुल पारख यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे. या अॅवॉर्डबद्दल समाजातील सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यापुढेही कॅमल परिवार आपल्या सेवेद्वारे ग्राहकांचा विश्वास असाच टिकून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.