Nitin Gadkari : नगर : एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील गरिबी वाढली असल्याचे सांगतिले. तसेच काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती (Wealth) एकवटल्याबाबत चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागाच्या कल्याणासोबतच आर्थिक विकास (Economic Development) करता यावा यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त
गडकरी म्हणाले,
‘हळूहळू गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती एकवटत आहे. असे होऊ नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि ग्रामीण भागाला चालना मिळेल.’ नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शेती, उत्पादन, कर आकारणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोट रिकामे असणाऱ्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही (Nitin Gadkari)
ते म्हणाले, ‘आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत जे रोजगार निर्माण करेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देईल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल करण्यात आले आहेत. ‘ गडकरी यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांचे कौतुक केले, परंतु अनियंत्रित केंद्रीकरणाविरुद्ध इशारा दिला. ‘उत्पादन क्षेत्राचे योगदान 22-24 टक्के आहे, सेवा क्षेत्र 52-54टक्के आहे, तर ग्रामीण लोकसंख्येच्या 65-70 टक्के लोकसंख्येवर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचे योगदान फक्त 12 टक्के आहे.’ स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करून ते म्हणाले की ज्या व्यक्तीचे पोट रिकामे आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही.