नगर : रस्ते अपघातात जखमी (Injured in road accident) झालेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अपघात पीडितांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची (Cashless Treatment’ Scheme) घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी सात दिवसांच्या उपचारांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे.
नक्की वाचा : ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’,रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले ? (Nitin Gadkari)
दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. या बैठकीचा उद्देश वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा करणे आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहकार्य वाढवणे हा होता.
या योजनेबाबत माहिती देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले,“आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट ही एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेद्वारे पीडिताच्या उपचारांवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर हिट अँड रन प्रकरणात मृत झालेल्या व्यक्तीसाठी सरकार दोन लाख रुपये देखील देणार आहे.”
अवश्य वाचा : बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पीडितांच्या कुटुंबियांना मिळणार २ लाख रुपयांचे अनुदान (Nitin Gadkari)
मंत्री नितीन गडकरी हे यावेळी म्हणाले की, हिट अँड रन अपघातात जीव गमावणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी होती. २०२४ मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.या चिंताजनक आकडेवारीचा उल्लेख करत त्यांनी रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे नमूद केले. त्यापैकी ३०,००० मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाले असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.