नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लोकमान्य टिळक या राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) सन्मानित करण्यात येणार आहे. १ ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी आहे. याचदिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नक्की वाचा : अभिनेता स्वप्निल जोशीच्या उपस्थितीत ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
पुरस्काराचे स्वरूप नेमकं काय ? (Nitin Gadkari)
या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
अवश्य वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड
डॉ. रोहित टिळक काय म्हणाले ?(Nitin Gadkari)
रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून नितीन गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले. त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नाने लोकचळवळीचे स्वरूप आले,असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले. ते म्हणाले,लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची २०२५ च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.