Nitin Gadkari:’दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या दरात मिळतील’-नितीन गडकरी

0
दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या दरात मिळतील- नितीन गडकरी
दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या दरात मिळतील- नितीन गडकरी

Nitin Gadkari : पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Bike Price) किंमती या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच होतील,असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ६४ व्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. यावेळी “अर्थमंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिल्यास आणखी फायदा होईल. तसेच त्या अनुदानास आमचा पूर्ण पाठिंबा असेल,असंही त्यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा : सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवरील खर्च कमी होणार- गडकरी (Nitin Gadkari)

नितीन गडकरी यावेळी म्हणाले की,“इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता अनुदानाची आवश्यकता भासणार नाही. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवरील खर्च कमी होणार आहे. ग्राहक देखील आता पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत”.भारतीय वाहन बाजारात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी ६.३ टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक होती. त्याच्या आधीच्या वर्षी झालेल्या विक्रीच्या तुलनेत ही विक्री दुप्पट होती.

अवश्य वाचा : ‘अजित पवारमध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत’- छगन भुजबळ
गडकरी म्हणाले की, “मी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विरोधात नाही. मात्र भारताचं पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करायला हवं. आपण दर वर्षी २२ लाख कोटी रुपये केवळ पेट्रोल-डिझेलवर खर्च करतो. त्याऐवजी आपण इलेक्ट्रिक वाहनं व इथेनॉलसारख्या बायोफ्यूलवर लक्ष द्यायला हवं”. यावेळी सीएनजीच्या वापराबाबतही त्यांनी भाष्य केलं. सीएनजी देखील उत्तम पर्याय असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केल.

‘इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल’  (Nitin Gadkari)

 “भारतात लाँच झालेली जगातली पहिली सीएनजी बाइक बजाज सीएनजीचं उदाहरण देत ते म्हणाले की, ही बाइक अवघ्या एक रुपयात एक किलोमीटर धावते. मात्र पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकला एक किमी अंतर पार करण्यासाठी दोन रुपयांहून अधिक पैसे लागतात. दुसऱ्या बाजूला इथेनॉल हा देखील चांगला पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही फायदा होत आहे. वाढत्या बायोफ्यूयलच्या म्हणजेच इथेनॉलच्या मागणीमुळे मक्याची किंमत देखील वाढली असल्याचे गडकरींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here