Nitin Gadkari:”देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ऑलिंपिक खेळाडू समजतो”,वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना नितीन गडकरींचा टोला

0
Nitin Gadkari:
Nitin Gadkari:"देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ऑलिंपिक खेळाडू समजतो”,वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना नितीन गडकरींचा टोला

Nitin Gadkari : देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ‘ऑलिंपिक खेळाडू’ (Olympic Athlete) समजतो.लोक कुणालाही न भीता रेड सिग्नल तोडतात आणि रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात,असं विधान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. भारतातील वाहतूक नियमांचे पालन न करण्यांवर ही उपहासात्मक टिप्पणी (Criticism) त्यांनी केली.

नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण;सुदर्शन घुलेनी दिली खून केल्याची कबुली  

“लोकांना कायद्याची भीती वाटत नाही” (Nitin Gadkari)

नितीन गडकरी म्हणाले की, “लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि त्याचा आदरही नाही. अनेकजण रेड सिग्नल दिसत असूनही तो तोडतात. महिला त्यांच्या कडेवर मुलांना घेऊन रस्ता ओलांडतात. मी म्हणतो,इतका उंच दुभाजक बांधा की, कोणीही ते ओलांडून जाऊ शकणार नाही. गाडी चालवताना फोनवर बोलणारेही असेच करतात. ते सिग्नलवर थांबत नाहीत किंवा हेल्मेट घालत नाहीत. भारतातील प्रत्येक नागरिक याबाबतीत ऑलिंपिक दर्जाचा खेळाडू आहे”

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला’-संभाजी भिडे 

‘दंगलीत जितके लोक मरत नाहीत,तितके रस्त्यावर मरतात’ (Nitin Gadkari)

“दंगली, हाणामारी किंवा महामारीमध्ये जितके लोक मरत नाहीत, तितके ते रस्त्यावर मरतात”,अशी टिप्पणी टाइम्स ड्राइव्ह ऑटो समिट अँड अवॉर्ड्स २०२५ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी केली.यावेळी नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते अपघात रोखण्यासाठी त्यांनी काय काय उपाय योजना केल्या त्याबाबत सांगितले. तसेच ते यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत हे मान्य केले. “हे असे एक क्षेत्र आहे, ज्याबद्दल मी माफी मागतो. गेल्या १० वर्षांत रस्ते अपघात रोखण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांना अजून यश आलेले नाही,” असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here