Nitin Gadkari : भारतातील मोटार उत्पादक कंपन्यांकडून येत्या सहा महिन्यांत शंभर टक्के बायोइथेनॉलवर(Bioethanol) चालणाऱ्या मोटारी (Cars) सादर करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर बायोइथेनॉलवरील दुचाकीही लवकरच बाजारात दाखल होतील,अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गडकरी यांनी संवाद साधला.
नक्की वाचा : भाजप बहुमतासाठी शिंदे,अजित पवारांचा पक्ष देखील फोडेल’ – संजय राऊत
‘बायो इथेनॉलवर चालणारी वाहने आल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा फायदा’ (Nitin Gadkari)
यावेळी गडकरी म्हणाले की, मी इथेनॉलवर चालणारी टोयोटाची इनोव्हा मोटार वापरतो. पुढील सहा महिन्यात ह्युंदाई, महिंद्रा, टाटा सुझुकी या चार कंपन्या शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी सादर करतील. याचबरोबर बजाज, टीव्हीएस, होंडा, हिरो या कंपन्या शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर आगामी काळात बाजारात आणणार आहेत. पूर्णपणे बायो इथेनॉलवर चालणारी वाहने आल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.
अवश्य वाचा : ‘एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे येण्याची गरज’,रामदास आठवलेंचा अजब सल्ला
‘आपण खनिज तेलाची आयात कमी करून आत्मनिर्भर बनू’ (Nitin Gadkari)
गडकरी पुढे म्हणाले की, पुण्यात प्रत्येक तालुक्यात साखर कारखाना असेल तर तिथे इथेनॉल निर्मिती होईल.तिथेच पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय उपलब्ध होणार असून त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. याचबरोबर डिझेलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा प्रस्ताव ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने पाठविला आहे. यामुळे आगामी काळात इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीतही वाढ होईल. याचबरोबर आपण खनिज तेलाची आयात कमी करून आत्मनिर्भर बनू, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.