Nitish Kumar | नगर : देशातील लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) नाव चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतही नितीश कुमारच्या नावांची चर्चा होत आहे. नितीश कुमारने ऐनवेळी केलेल्या तडाखेबाज खेळीच्या बळावर युएसएने (USA) पाकिस्तान (Pakistan) संघावर सुपर सिक्स षटकांत पाच धावांनी विजय मिळविला.
हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका
ह्रदयाचे ठोके वाढविणारा सामना (Nitish Kumar)
विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल (गुरुवारी) युएसए व पाकिस्तान संघांत साखळी सामना झाला. ह्रदयाचे ठोके वाढविणारा हा सामना सर्वांच्याच चिरस्मरणात राहणारा ठरला आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझमच्या ४४ धावा (४३ चेंडू) व शादाब खानच्या ४० धावांच्या (२५ चेंडू) तडाखेबाज खेळीच्या जोरावर २० षटकांत सात गडी गमावत १५९ धावा केल्या. युएसएच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्या समोर पाकिस्तानचे फलंदाज जास्त धावा जमवू शकले नाहीत. युएसएच्या नोशतुश केंजीगेने तीन तर मुंबईच्या सौरभ नेत्रावळकरने दोन फलंदाज बाद केले.
नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!
पाकिस्तानची चिंता वाढली (Nitish Kumar)
युएसए संघाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी विरोधात चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. कर्णधार मोनांक पटेलने ३८ चेंडूंत केलेल्या ५० धावा, अँड्रिस गॉसने २६ चेंडूंत केलेल्या ३५ धावा व अॅरन जोन्सने २६ चेंडूंत केलेल्या ३६ धावांच्या बळावर युएसएच्या संघानेही १५९ धावा जमविल्या. या धावा जमविताना युएसएचे केवळ तीन फलंदाज बाद झाले. नितीश कुमारने २०व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मारलेल्या चौकाराच्या बळावर ही बरोबरी झाली आणि पाकिस्तानची चिंता वाढली.
हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका
पुढील फेरीत जाण्याच्या आशा धूसर (Nitish Kumar)
नितीश कुमारच्या चौकारामुळे या सामन्याचा निकाल सुपर सिक्स षटकाला ठरविण्याची संधी मिळाली. या षटकात पाकिस्तानने सुमार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत युएसए संघाला १८ धावा बहाल केल्या. एकट्या अॅरन जोन्सने सहाही चेंडू खेळत ११ धावा केल्या. युएसएकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरने युएसएसाठी सुपर ओव्हर टाकली. त्याने केलेल्या अचूक गोलंदाजी समोर पाकिस्तान संघ एक फलंदाज गमावत १३ धावाच जमवू शकला. या लाजिरवाण्या पराभवामुळे पाकिस्तान संघाला पुढील फेरीत जाण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.