NMMS Exam : अकोले: नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS Exam) इंदोरीच्या (ता.अकोले) प्रवरा विद्यालयातील १४ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये समृद्धी शशिकांत आरोटे, समृद्धी शांताराम मधे, गार्गी अविनाश कानवडे, रविना बुधा पारधी, भाग्यश्री पांडुरंग मधे, श्रावण नवनाथ भोर, शुभम भाऊसाहेब भुतांबरे, पीयूष राजेश सावंत, स्नेहल रवींद्र जाधव, स्निग्धा बाळासाहेब चासकर, अनुष्का दिनेश हासे, अनुष्का अरुण नवले, दुर्वा यशवंत आरोटे व पूर्वी अनिल मधे यांचा समावेश आहे. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगर संस्थेचे कौन्सिल सदस्य राजेंद्र मोरे व पोलीस पाटील अशोक नवले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
अवश्य वाचा- जिल्ह्यात हरभरा पिक हमीभावाने खरेदीसाठी १० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी
विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्यावतीने आयोजन (NMMS Exam)
यावेळी संस्थेचे सचिव आठरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक भारत हासे यांनी विद्यालयात स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत कसे होतील यासाठी वेगवेगळी स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच विद्यालयातील शिक्षकांकडून देखील चांगल्या प्रकारे अध्यापन करून घेतले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्यावतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन समितीच्या अध्यक्षा शीतल बिबवे यांनी केले. शिक्षक एस. व्ही. बांगर, आर. वाय. कोंडार, बी. एम. भोजणे, शहाजी मुन्तोडे, जे. जी. वाघ, अमोल देशमुख, प्रसाद देशमुख, संदीप भरीतकर, शशिकांत चौधरी, शिक्षिका सीमा धुमाळ, लक्ष्मी मुंढे, अरुण भोमले, एस. बी. गावडे, राजेश बेनके यांनी मोलाचा सहभाग घेतला.



