Shatrughan Sinha:’भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे’;अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

0
Shatrughan Sinha:'भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे';अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
Shatrughan Sinha:'भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे';अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

नगर : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actor) आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी मांसाहाराबाबत (Non Veg) मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतात मांसाहारावर बंदी घालण्यात यावी,असं वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच,देशात समान नागरी संहिता (Uniform Civil Code) लागू करण्याबाबतही त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित   

‘देशात फक्त गोमांसच नाही तर मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे’ (Shatrughan Sinha)

संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,”देशाच्या अनेक भागांत गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मला वाटतं की, देशात फक्त गोमांसच नाही तर सर्वसाधारणपणे मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे”. ईशान्येसह काही ठिकाणी, गोमांस खाणं अजूनही कायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “वाह खाओ तो यम्मी,पर हमारे नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी.”

अवश्य वाचा : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’,राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याने वादंग  

शत्रुघ्न सिन्हा यांचा यूसीसीला पाठिंबा (Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल सांगताना देशभरात त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, “उत्तराखंडमध्ये यूसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. देशात समान नागरी कायदा निश्चितच लागू केला पाहिजे आणि मला खात्री आहे की, सर्वजण माझ्याशी सहमत असतील. पण त्यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत.म्हणूनच यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. या विषयावर प्रत्येकाचं मत जाणून घेण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे,असं देखील त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here