Sanjay Raut : देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. १५०० रुपये देता,पण बहिणी रिकाम्या पिशव्या घेऊन येतात. १५०० मध्ये काही येत नाही. तसेच महसूल वाढवण्यासाठी सरकार जर दारूचे दुकान वाढवणार असतील. ड्राय-डे कमी करणार असतील म्हणजे लाडक्या बहिणींना १५०० रुपये द्यायचे आणि घरात दारुडे तयार करायची ही काम आहे,असं म्हणत लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) १५०० रुपये देण्यासाठी नवऱ्यांना दारुडे करणार का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित केला.
नक्की वाचा : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर,भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला
‘महाराष्ट्र दारूडा करण्याची यांची योजना ही गंभीर बाब’ (Sanjay Raut)
यावेळी संजय राऊत यांनी राज्याचे उत्पादन वाढावे,यासाठी मद्य विक्री दुकानांचे परवाने वाढवण्याच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री अजित पवार आणि राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले आहे. राऊत म्हणाले की, “लाडक्या बहीणींना दीड हजार देण्यासाठी लाडक्या बहिणींचा भाऊ आणि नवरा यांना दारुडे करणार आहेत. १५०० रूपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारूडा करण्याची यांची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहेत. मी ऐकलं की दारूची दुकाने वाढवणार, ‘ड्राय डे’ कमी करणार.त्यानंतर दुकाने आणि मॉलमधून दारू विक्री करण्यासंदर्भात प्रस्ताव आला आहे. काहीही करून लाडक्या बहिणींना १५०० देण्यासाठी घरा घरात दारू पोहचवा,असं ध्येय दिसतंय. म्हणजे बहिणींना १५०० द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरात बेवडे-दारूडे निर्माण करायचे अशी पैसे कमवण्याची योजना दिसतेय.”
अवश्य वाचा : ‘ट्राय’चा मोठा निर्णय!आता कॉलिंग आणि एसएमएससाठी मिळणार वेगळे प्लॅन
‘लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते’ (Sanjay Raut)
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते,असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, “भविष्यात ते लाडकी बहीण योजना बंद करू शकतात. निवडणुकींच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यानंतर तुम्ही निकष लावताय. लाडक्या बहीणींना पंधराशे रुपये देण्यासाठी दारू दुकानाचे परवाने वाढवणे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. बहिणींनी आपल्या घरात १५०० रुपयात आपण कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे. सरकार चांगल्या मनाने पैसे देत नाहीये”,असेही त्यांनी सांगितले.