Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी

Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी

0
Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी
Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी

Nylon Manja : नगर : भारतीय कायद्याच्या आधारे नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल (Crimes filed) होत आहेत. त्याच नियमानुसार नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्यात यावेत. नायलॉन मांजा वापरणारा अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे ॲड. श्याम आसावा (Adv. Shyam Asawa) यांनी जिल्हा न्यायालयाचे (District Court) मुख्य न्यायाधीश, जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) व महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नक्की वाचा : सुपा एमआयडीसीतील टायर कंपनीला आग

निवेदनात म्हटले आहे की, 

मागील काही दिवसापासून अहिल्यानगर महापालिका हद्दीत व जिल्ह्यात काही ठिकाणी हसन व पोलिसांनी नायलॉन माझ्या वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केले आहे. प्लास्टिक अथवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा धोका असतो. हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच राहतात आणि ते जैवविघटनशील नसल्यामुळे मातीमध्ये मिसळतात. गटारे अडवणे, ड्रेनेज लाइन, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक पाण्याचे मार्ग, माती यावर विपरीत परिणाम होतात. पडलेले धागे कापून पडल्यामुळे गुरेढोरे, गायी आणि इतर प्राणी नायलॉनसह अन्नपदार्थ खातात. त्यामुळे राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

अवश्य वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी (Nylon Manja)

केवळ दंडात्मक कारवाई केल्याने घातक मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर जरब बसत नाही. संबंधितांवर इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणे व पर्यावरणाबाबतचे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींवर आता मोक्का तसेच तडीपार अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देत दोन जणांवर तशी कारवाई सुरू केली आहे. याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही कारवाई होणे आवश्यक आहे.

Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी
Nylon Manja : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्याची मागणी

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक आदेश दिला आहे. त्यात म्हटले आहे की, नायलॉन मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी मांजाची विक्री व साठवणूक सापडेल त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाया न करता ते ठिकाण सील करण्यात यावी व मांजाचा वापर करणाऱ्यांवर व वापर करणारे जर अल्पवयीन असतील तर त्यांच्या पालकांवर कारवाई  होणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.