Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल

0
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल

Nylon Manja : शेवगाव : पतंगबाजीला (Kite Flying) शेवगाव शहरात उधाण आले आहे. मात्र, पतंगबाजीच्या धुमधडाक्यात नायलॉन मांजाने (Nylon Manja) एकाच्या तोंडाला कापल्याने तो गंभीर जखमी (Serious Injuries) झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी मिरी रस्त्यावर घडली. यामध्ये अमीन फिरोज शेख (वय १६, रा. इदगाह मैदान, शेवगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय  

याबाबत समजलेली माहिती अशी की,

अमीन शेख हा न्यू आर्टस् महाविद्यालयामध्ये १२ वीचे शिक्षण घेत आहे. तो गुरुवारी (ता. २६) शेवगाव – मिरी रस्त्याने वडुले बुद्रक (ता. शेवगाव) येथून शेवगाव शहराकडे येत होता. दरम्यान, तो मिरी रस्त्यावरील फलके किराणा दुकाना समोरुन जात असतांना त्याच्या तोंडाला नायलॉन मांजा अडकला. मांजामुळे तोंडापासून ते कानापर्यंत कापले गेले. मांजा धारदार असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. वाहन वेगात असल्याने तो वाहनासह रस्त्यावर पडल्याने तो बेशुध्द पडला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित मिरी रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. जखमी अमीनच्या तोंडाला आतून व बाहेरून २६ टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला, तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मुलाचा कापला गाल

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री (Nylon Manja)

मकर संक्रातीच्या काळात पतंग उडविणारांची संख्या शहरात वाढत आहे. त्यातच काही विक्रेते बंदी असलेल्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. या धारदारमांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याबाबत पोलीस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होतआहे. मांजाची विक्री करणारे दुकानातील सर्व साहित्य जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here