OBC : पाथर्डी : ओबीसी (OBC) एल्गार मेळाव्याचे पोस्टर्स फाडून लोकनेत्यांचा व राष्ट्रसंताचा अवमान (Contempt) करणाऱ्या समाजकंटकाचा निषेध (Prohibition) व्यक्त करत पाथर्डी शहरातील नाईक चौकात ओबीसी कार्यकर्त्यांकडून प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व दिलीप खेडकर यांनी केले. यावेळी रमेश गोरे, अरविंद सोनटक्के, किसन आव्हाड, भोरू म्हस्के, कल्पजित डोईफोडे, अंकुश बोके, रणजित बेळगे, नागनाथ गर्जे, आकाश वारे, शेखर तुपे, गणेश भडके, ऋषिकेश भडके, ज्ञानेश्र्वर भडके, भारत भडके, सोनू पोटे, संकेत कुटे, दिपक गादे, गणेश सोनटक्के, संदिप लोखंडे, बाळासाहेब भडके, संदिप भडके, सचिन भडके आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत संतप्त झाले होते.
हे देखील वाचा : कर्जत तालुका ओबीसी समाजाचा तहसीलवर मोर्चा
समाजकंटकांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश (OBC)
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथे प्रांत कार्यालयासमोर बॅनर लावलेला आहे. परंतु बुधवारी (ता.३१) रात्री ८ वाजेपासून ते गुरूवारी पहाटे ५ वाजेदरम्यान काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने ओबीसी मेळाव्याचे पोस्टर फाडून व त्यातील राष्ट्र पुरुषांचा फोटो असलेला काही भाग जाळून त्यातील थोर पुरुषांचा व संतांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याने गुरुवारी (ता.१) सायंकाळी पाथर्डी शहरातील नाईक चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. या घटनेचा शोध लावून २४ तासात आरोपीचा शोध लावून तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
नक्की वाचा : अंतरिम बजेट म्हणजे शेतकरी, गरिबांची फसवणूक; विराेधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका
पोस्टर्सवरती समाजातील थोर पुरुषांची प्रतिमा (OBC)
लोकनेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन नगर येथे केलेले आहे. या मेळाव्याची पाथर्डी तालुक्यातील सर्व नागरिकांना माहिती व्हावी म्हणून सकल ओबीसी समाजाने ठिकठिकाणी पोस्टर्स लावलेले आहेत. या पोस्टर्सवरती समाजातील थोर पुरुषांची प्रतिमा प्रिंट केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा, सावता महाराज, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमा छापलेल्या आहेत. पोस्टर फाडून अवमान करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे दिलेला निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार मुरलीधर बागुल, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्याकडे आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त करत निवेदन दिले.