OBC : ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढणार : प्रा. लक्ष्मण हाके

OBC : ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढणार : प्रा. लक्ष्मण हाके

0
OBC

OBC : नगर : गावगाड्यातील ओबीसी (OBC) समाज, भटका विमुक्त समाज, वंजारा समाज, घिसाडी, लोहार, सुतार आजही वंचित आहे. निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, विधानसभा (Assembly), लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) ओबीसी समाजातील घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. कायदा ज्या सभागृहात तयार होतो. त्या सभागृहात ओबीसींचे प्रतिनिधी नसल्याने ओबीसींवर अन्याय होत आहे.

OBC

अवश्य वाचा: ‘मविआ’चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे

विधानसभेत ओबीसी समाज जागा दाखवून देईल

जोपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही. तोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. प्रत्येक पक्ष म्हणतो. ओबीसीला धक्का लावणार नाही. परंतु ओबीसी चे कुणबी दाखले मागच्या दाराने देऊन ओबीसींवर अन्याय होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी उमेदवार देण्याची तयारी होत आहे. येणाऱ्या निवडणुकीत नगर जिल्ह्याने मागे राहू नये. ओबीसींचे आमदार होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 65 टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे. नगर जिल्ह्यातील एकाही आमदाराने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला पाठिंब्याचे दोन ओळीचे पत्र देखील दिलेले नाही. त्यांना येणाऱ्या विधानसभेत ओबीसी समाज जागा दाखवून देईल. ओबीसींनो जागे व्हा. ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारांनाच मते द्यावीत. ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून आपली ताकद दाखवून देईल. तसेच ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी लढा उभारणार असल्याचे असे प्रतिपादन मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले आहे.

नक्की वाचा: शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद

ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित (OBC)

नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय भटक्या विमुक्त सकल ओबीसी समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी ओबीसी व्हिजेएनटी जन मोर्चाचे चे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अण्णा शेलार, सुधाकर आव्हाड, बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, बंडू भुकन, दादाभाऊ चितळकर,शरद झोडगे, मंगल भुजबळ,सुभाष लोंढे, संगीता खामकर, रामदास कोल्हार, विठ्ठल शेलार, शांतीलाल कोपनर, रमेश सानप,अनिल निकम, ज्ञानदेव खराडे, विकास ताठे, रामदास आहेर, भरत रसाळ, गोकुळ दौंड, संभाजी पालवे, गोरक्ष गावडे, भरत गारुडकर, शिवाजी खेतमाळीस, सुदाम रोडे, रामदास शिरसागर, अभिषेक कोल्हे, माऊली मामा गायकवाड, सुनील भिंगारे, प्रवीण पवार, विष्णू कारवाडे, राजेंद्र पडोळे, निलेश चिपाडे, एडवोकेट सतीश पालवे आदींसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

OBC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here