OBC Reservation:ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

0
OBC Reservation:ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
OBC Reservation:ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नगर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीवर सुवर्णमध्य साधला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, या शासन निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यानंतर,आज राज्य शासनाने ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती (Cabinet Subcommittee) गठीत केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याचे समजते. चंद्रशेखर बावनकुळे हे या समीतीचे अध्यक्ष असतील अशी माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार (OBC Reservation)

ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातल्याचे वृत्त आहे. भुजबळांच्या नाराजी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक देवगिरी या सरकारी निवासस्थानी बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर, महायुतीत मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत बैठक होतं असल्याची माहिती आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षणप्रश्नी होतं असलेल्या अन्यायाबाबत उघड भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या पार पडणाऱ्या बैठकीला विशेष महत्व आहे.

अवश्य वाचा : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल

उपसमितीत कोण मंत्री?

ओबीसींच्या विकासासाठी ही उपसमिती गठीत करण्यात येणार असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आखले जाणार आहेत. तसेच ओबीसांच्या योजनांबाबत ही समिती कामकाज पाहणार आहे. या समितीचे अध्यक्षपद हे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहे. तर या समितीत भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे दोन मंत्री असणार आहेत. यामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे समितीचे सदस्य असतील अशी माहिती आहे.