Obscene Videos : अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा, दोघांना अटक

Obscene Videos : अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा, दोघांना अटक

0
Obscene Videos : अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा, दोघांना अटक
Obscene Videos : अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा, दोघांना अटक

Obscene Videos : नगर : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ (Obscene Videos) सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी दिली आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याचे निष्पन्न

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संबंधित पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोपरगाव येथील ‘बी एम डब्लू’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर २५ मार्च २०२६ रोजी राहुल गंगाधर शिंदे याने हे व्हिडिओ प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (Obscene Videos)

पोलीस तपासात हे व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव याने शिंदे याला पाठविले असल्याचे, तसेच आढाव याला ते व्हिडिओ त्याचा मित्र संदिप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठविल्याचे उघड झाले. यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपी राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना अटक करण्यात आली असून संदिप गर्जे याचा शोध सुरू आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अनेक महिला पीडित असण्याची शक्यता असल्याने तपास अत्यंत गोपनीयतेने करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलांची ओळख उघड होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पोलिसांनी नागरिक, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवाहन केले आहे की, पीडित महिलांची ओळख उघड करणारे किंवा अश्लील स्वरूपाचे कोणतेही व्हिडिओ तात्काळ डिलीट करावेत व ते प्रसारित करू नयेत. असे कृत्य केल्यास संबंधित व्यक्तींसह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.