Gujarat Viral Video:बापरे!गुजरातमध्ये चक्क वॅगनर कारवर अंत्यसंस्कार,जाणून घ्या..  

0
Gujarat Viral Video:बापरे!गुजरातमध्ये चक्क वॅगनर कारवर अंत्यसंस्कार,जाणून घ्या..  
Gujarat Viral Video:बापरे!गुजरातमध्ये चक्क वॅगनर कारवर अंत्यसंस्कार,जाणून घ्या..  

Gujrat Viral video : ‘ऐकावं ते नवलच’ ही उक्ती काही खोटी नाही.आजवर माणसाने प्राण्यांवर अंत्यसंस्कार केलेले बघितले असतील.परंतु एका निर्जीव वस्तूवर मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार केलेले कदाचितच पाहिले असतील. मात्र असं घडलं आहे गुजरातमध्ये (Gujarat). एका शेतकऱ्याने आपल्या जुन्या कारवर अत्यंसंस्कार (Car cremation) केलेत.

नक्की वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार

कुठे घडला प्रकार? (Gujarat Viral Video)

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यामध्ये पदारसिंह गावात हा प्रसंग घडला. संजय पोलरा या शेतकऱ्याने आपली १५ वर्षे जुन्या वॅगनर कारवर समाधी संस्कार केले. त्यासाठी तब्बल ४ लाख रुपयेही खर्च केले. एवढंच नाही तर या समाधी सोहळ्यासाठी १५ हजार लोकांची उपस्थिती होती. समाधी सोहळ्यासाठी संत-महंत,अध्यात्मिक गुरु, नेते मंडळी आणि गावकरी उपस्थित होते. संजय पोलरा यांच्या कुटुंबासाठी ही वॅगनर कार एक प्रकारे ‘लकी’ होती. अंत्यसंस्कारांचा सोहळा गुरुवारी (ता.७) पोलरा यांच्या शेतात पार पडला.

अवश्य वाचा : ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे
या वॅगनर कारची फुलांनी सजावट करण्यात आली. त्यानंतर घरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. शेतामध्ये नेल्यानंतर तिथे १५ फूट खोल खड्डा खोदण्यातआला. कुटुंबाने गाडीची विधीवत पूजा केली आणि मंत्रोच्चारात गाडीला खड्ड्यात उतरवलं. वॅगनर कारवर हिरवा कपडा टाकण्यात आला होता. त्यावर गुलाबाच्या फुलांची सजावट करण्यात आली. हळहळू कार खड्ड्यामध्ये उतरवली आणि विधीवत ‘समाधी’ देण्यात आली. त्यानंतर पोलरा यांनी कारबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.

कारचे मालक काय म्हणाले? (Gujarat Viral Video)

पोलरा यांनी सांगितलं की, बारा वर्षांपूर्वी मी कार खरेदी केली होती. त्यानंतर आमच्या कुटुंबात सुख-समृद्धी आली. व्यवसायात यश यायला लागलं. ही कार आमच्यासाठी भाग्याची होती. त्यामुळे तिला विकण्यापेक्षा आम्ही आमच्या शेतात श्रद्धांजली स्वरुप समाधी देण्याचा निर्णय घेतला. जिथे कारला समाधी देण्यात आलेली आहे, तिथे आम्ही एक झाड लावणार आहोत. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना कारची आठवण होईल आणि या कारचं योगदान ते लक्षात ठेवतील. कारच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आलेली होती. तब्बल १५ हजार लोकांनी भोजनाचा लाभ घेतला. या जगावेगळ्या प्रसंगाची व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here