नगर : आयपीएल २०२६ (IPL 2026) चा लिलाव (IPL Oction)१६ डिसेंबरला पार पडला. १० संघांनी त्यांना हव्या असलेल्या खेळाडूंवर मोठ्या रक्कमेची बोली लावली. यामध्ये काही नवीन खेळाडूही होते. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे ओंकार तारमळे(Omkar Tarmale). ओंकार तारमळे हा मराठमोळा खेळाडू लिलावात होता आणि त्याच्यावर लाखोंमध्ये बोली लागली. सध्या ओंकार हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याला सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या संघाने ३० लाख रुपये देऊन विकत घेतलं आहे. या मराठमोळ्या खेळाडू बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…
नक्की वाचा: राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला;१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल
ओंकार तारमळे नेमका कोण ? (Omkar Tarmale)
२२ ऑगस्ट २००२ रोजी जन्मलेला ओंकारचे पूर्ण नाव ओंकार तुकाराम तारमळे असे आहे. त्याचे वय सध्या २३ वर्ष आहे. ओंकार हा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याचे वडील शेती करतात. शहापूरच्या शेरे या छोट्याश्या गावात त्याचं साधं घर आहे. वडील शेती करून जे काही कमवतील त्यावरच त्याचं घर व शिक्षण चालतं. गावातल्या क्रिकेट टीममध्ये टेनिस बॉलवर तो खेळायचा. तो सगळ्यात आधी कोच असलेल्या नरेंद्र दिवाणे यांच्या नजरेत आला.
त्याची उंची, त्याची बॉलिंग करण्याची स्टाईल त्यांना भावली. त्यांनी त्याला आपल्याकडे प्रॅक्टिसला यायला सांगितले. त्यासाठी त्यांच्या घरच्यांची ही दिवाणे यांनी समजूत घातली. घरची स्थिती हलाखीची होती. त्यामुळे पुढे काय होईल ? असा प्रश्न ओंकारच्या वडिलांना सतावत होता. त्यावेळी नरेंद्र दिवाणे यांनी त्यांना विश्वास दिला. दोन वर्ष त्याला द्या त्यानंतर पाहा असा सल्ला ही दिला.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ३१ डिसेंबरनंतर ‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ थांबणा
ओंकारचा खेळ नेमका कसा आहे ? (Omkar Tarmale)

ओंकार हा उजव्या हाताने वेगवान-मध्यम गतीने गोलंदाजी करतो. फलंदाजी देखील तो चांगली करतो. खालच्या फळीत धडाकेबाज फटके मारण्याची क्षमता त्याच्यात आहे. ओंकारची ओळख सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेटमधील आक्रमक वेगवान गोलंदाज म्हणून होती. त्यानंतर त्याने हार्ड बॉल क्रिकेटमध्ये यशस्वीपणे एन्ट्री घेतली. मुंबई आणि ठाणे परिसरातील स्थानिक आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तो ईगल ठाणे स्ट्राइकर्स सारख्या संघांकडून खेळताना दिसतो.
ओंकारची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची उंची आणि नैसर्गिक बाऊन्स. त्याच्या गोलंदाजीतील उसळीमुळे फलंदाजांना चेंडू खेळताना अडचणी येतात. स्थानिक टी – २० सामन्यांतील व्हिडीओ क्लिप्स मध्ये त्याचा चेंडू पिचवरून तीव्र उसळी घेताना दिसतो. ज्या वेळी आयपीएल २०२६ चे ऑक्शन सुरू होते, त्यावेळी ओंकार गावातल्या मंदिरात होता. निवड होईल की नाही, याची चिंता त्याला होती. पण नशिबाने व त्याच्या मेहनतीने त्याला साथ दिली आणि ओंकारला हैदराबाद संघाने खरेदी केले.



