Onion : नगर : केंद्र सरकारने (Central Govt) कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी कमी झाले. याचा निर्यातबंदीनंतर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा (Onion) विकलेल्या शेतकऱ्यांना (farmers) जवळपास एक हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी (Export ban) तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
नक्की वाचा : मराठा आरक्षणाच्या आड येणारांना गुलाल लागू देणार नाही : मनोज जरांगे
सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी केल्याने कांदा बाजार विस्कळीत झाला. याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. कांदा निर्यातबंदीच्या आधी बाजारात कांदा सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात होता. मात्र, निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आले. म्हणजेच कांद्याचे भाव क्विंटलमागे तब्बल २ हजार रुपयाने पडले. शेतकऱ्यांना १४ दिवसांमध्ये कांद्याचे भाव पडल्याने तब्बल एक हजार कोटींचा फटका बसला आहे.
हे देखील वाचा: अयाेध्येतील श्रीरामाच्या दरबारासाठी तब्बल इतक्या किलाेची महाकाय घंटा; देशभरात चर्चा