Onion : शेतकऱ्यांनाे कांदा बियाणे खरेदी करायचे आहेत का?; आजपासून इथं शासनाकडून विक्री सुरू

Onion : शेतकऱ्यांनाे कांदा बियाणे खरेदी करायचे आहेत का?; आजपासून इथं शासनाकडून विक्री सुरू

0
Onion
Onion : शेतकऱ्यांनाे कांदा बियाणे खरेदी करायचे आहेत का?; आजपासून इथं शासनाकडून विक्री सुरू

Onion : नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) कांदा बियाणांना शेतकऱ्यांची (Farmer) अधिक मागणी असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लोकप्रिय खरीप कांदा (Onion) बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत-७८० या बियाण्यांची विक्री मंगळवार (ता. २१) पासून सुरू करण्यात येणार आहे. यंदा दीडशे क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे बियाणे विभागातून सांगण्यात आले.

Onion
Onion

हे देखील वाचा: ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे

१५० क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

यंदासाठी मंगळवार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शेतकऱ्यांसाठी १५० क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अनेकवेळा पोलीस संरक्षणात या कांदा बियाणांची विक्री विद्यापीठांमार्फत केली गेली आहे. विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात मुख्य प्रवेशद्वाराशेजारी बियाणे विक्री केंद्रात विक्री सुरू होणार आहे.

नक्की वाचा: यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!

प्रति किलो रुपये १५०० प्रमाणे उपलब्ध (Onion)

कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यांतील कृषी विद्यापीठातील अनेक केंद्रांमध्ये देखील बियाणे विक्री सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी संशोधन केंद्र निफाड. कांदा-लसूण, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, लखमापूर, तसेच कृषी महाविद्यालय मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, कृषी महाविद्यालय, पुणे येथे होणार आहे. नगर जिल्ह्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी महाविद्यालय, हळगाव, जामखेड व नगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र, चास येथे फुले बसवंत ७८० व फुले समर्थ या बियाणांच्या विक्रीचे नियोजन विद्यापीठामार्फत केलेले आहे. विद्यापीठाने शेतकरी बांधवांना कांदा बियाणे प्रति किलो रुपये १५०० प्रमाणे उपलब्ध केलेले आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यंदा ऑफलाइन व रोख पद्धतीने विक्री सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले

Onion
Onion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here