Onion : जिल्ह्यात कांद्याचे २ हजार ५६ हेक्टर बनावट क्षेत्र

Onion : जिल्ह्यात कांद्याचे २० हजार ५६ हेक्टर बनावट क्षेत्र

0
Onion : जिल्ह्यात कांद्याचे २० हजार ५६ हेक्टर बनावट क्षेत्र
Onion : जिल्ह्यात कांद्याचे २० हजार ५६ हेक्टर बनावट क्षेत्र

Onion : नगर : जिल्ह्यातील सात तालुक्यात कांदा (Onion) लागवडीचे अधिक क्षेत्र दाखवून पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम लाटण्याचा प्रयत्न कृषी विभागाने (Agriculture Department) हाणून पाडला आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव व पाथर्डी या सात तालुक्यात २ हजार ५५.९८ हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या क्षेत्रावर कांदा पीक घेतले नसल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत उघड झाले आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन २०२४ अंतर्गत राज्यात पेरणी अहवालापेक्षा जास्त क्षेत्रावर पीक विमा काढल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कृषी विभागाने जिल्ह्यातील सात हजार २४१ शेतकऱयांनी २ हजार ५५ हेक्टर क्षेत्रावर कांदा नसतानाही पीक विम्याची नोंद केली आहे. या सातही तालुक्यातील अहवाल प्राप्त झाले असून, बनावट अर्ज (Fake Onion Field) रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्यामुळे पीक विमा हप्त्यापोटी शासनाची सुमारे १ कोटी २७ हजार रुपयांच्या विमा रकमेची बचत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. 

नक्की वाचा : ‘शरद पवारांना भीती आहे की आपला पक्ष अर्धा होईल’- चंद्रशेखर बावनकुळे

चुकीचा पिक विमा उतरविणा-यांचे होऊ शकते नुकसान

“शासनाने पुढाकार घेत जिल्हयातील शेतक-यांसाठी १ रुपयात पिक विमा योजना सुरु केली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमिवर नैसर्गिक संकटे आल्यास च चुकीचा पिक विमा उतरविणाऱ्या शेतक-यांचे मोठे आधिक नुकसान होऊ शकते. म्हणून जे पिक पेरले आहे त्याच पिकाचा विमा उतरवणे हे शेतकरी हिताचे आहे”
सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी अहिल्यानगर  

तालुकानिहाय आकडेवारी (Onion)

कांदा लागवडीचे अधिक क्षेत्र दाखवून पीक विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न

तालुका          अर्जदार संख्या               क्षेत्र हे.
१-संगमनेर`   –       ३६              –     ९.७६
२-श्रीरामपूर  –       १३२              –     ८१.०७
३- राहुरी      –      ५६२              –     २१७.४९
४- नेवासा     –     १४०९             –     ६०१.४८
५- श्रीगोंदा    –     १३६१             –      २६८.६८
६- कोपरगाव –     २७६             –      १३०.५७
७- पाथर्डी     –     ३४६५            –     ७४६.९३
एकूण –             ७२४१              –     २०५५.९८