Onion : नगर : कांद्याच्या (Onion) दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या केंद्र सरकारपर्यंत (Central Government) पोहचविण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी (ता. १२) संसद भवनाच्या (Parliament House) मकर द्वारासमोर तीव्र आंदोलन केले.
नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व
यावेळी खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत शेतकरी कोमात आणि सरकार जोमात अशी टीका खासदार निलेश लंके यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार भास्कर भगरे, राजाभाउ वाजे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर खासदार सहभागी झाले होते.
अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
सरकारच्या सध्याच्या धोरणांवर टीका (Onion)
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आंदोलकांचा सूर आक्रोशमय होता. विविध खासदारांनी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर टीका केली. सध्या कांद्याला बाजारात केवळ १० ते १२ रूपये प्रति किलो इतकाच भाव मिळत आहे. तर उत्पादन खर्च १४ ते १५ रूपये प्रतिकिलो आहे. शेतकरी दर किलोमागे तोटाच सहन करत आहे. कांदा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. पण इतके कष्ट करून जर भाव मिळणार नसतील तर शेतकऱ्याला आत्महत्येच्या उंबरठयावर आणणाऱ्या व्यवस्था बदलल्या पाहिजेत. यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवतोय आणि रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणतोय, असे ते म्हणाले.