Onion Price : कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात(Onion Price) वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र,प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण (Onion prices fall) होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. मागील आठवड्यात कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल झाली असून,राज्यातील एकूण कांदा आवकमध्ये नाशिकचा मोठा वाटा आहे. मात्र,कमी दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट (Financial crisis on farmers) ओढवले आहे.
नक्की वाचा : भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार
अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान (Onion Price)
मागील आठवड्यात कांद्याला किमान ८४० रुपये, तर कमाल १२५० रुपये दर मिळाला. एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा फटका कांद्याच्या प्रतवारीला बसत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होत आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानेही कांद्याचे नुकसान केले. परिणामी, शेतकरी आता कांद्याची प्रतवारी करण्यात गुंतले आहेत. चांगले बाजारभाव मिळण्याची वाट पाहत, प्रतवारी केलेला कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
अवश्य वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका;घेतले ५ मोठे निर्णय
उन्हाळी कांद्याची साठवण (Onion Price)
उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने,हा कांदा चाळींमध्ये साठविला जातो. शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून साठवतात आणि बाजारभाव वाढल्यानंतर तो विक्रीसाठी आणतात. एप्रिल-मे महिन्यांत साठविलेला कांदा जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये विक्रीसाठी बाजारात येतो. पावसाळ्यात कांद्याची आवक कमी झाल्याने या कालावधीत दरात वाढ होते. याच धोरणानुसार शेतकरी सध्या कांदा साठवणीवर लक्ष देत आहेत.