Onion Rate:कांदा दरवाढीनंतर केंद्रसरकारचा मोठा निर्णय,सरकार ‘या’ दरानं विकणार कांदा 

0
Onion News:कांदा दरवाढीनंतर केंद्रसरकारचा मोठा निर्णय,सरकार 'या' दरानं विकणार कांदा 
Onion News:कांदा दरवाढीनंतर केंद्रसरकारचा मोठा निर्णय,सरकार 'या' दरानं विकणार कांदा 

नगर : देशात पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी पिकांचे जोरदार नुकसान झाले आहे.त्यातच बाजारात कांद्याचे दर (Onion Rate) वाढत आहेत. एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) सरकार आता ३५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

नक्की वाचा : ‘त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज’;शरद पवारांचे सूचक विधान

दिल्लीत कांद्याचा दर ६० रुपये किलो (Onion Rate)

ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना या वाढत्या दराचा चांगला फायदा होत असतानाच सरकारने हा निर्णय घेतलाय. दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या ठिकाण नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव ६० रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता या भागात ३५ रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अवश्य वाचा : ‘एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ गाणं प्रदर्शित

दिल्ली-एनसीआरमध्ये केंद्र सरकारकडून कांद्याची विक्री सुरू (Onion Rate)


दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार आजपासून कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. हे दोन्ही सरकारी युनिट ३५ रुपये किलो दराने सर्वसामान्यांना कांदा उपलब्ध करून देणार आहेत. नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सरकारच्या वतीने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here