नगर : गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस होण्याचे स्वप्न मनात बाळगून अनेक तरुण भरती होण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे आता राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharti) होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया आज मंगळवार (ता.५) पासून सुरू होत आहे. भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Online Form) सादर करता येणार आहे.
नक्की वाचा : राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज
शासनाने राज्यभरात १७ हजार पोलिस शिपाई पदासाठी भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार, शासनाने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ तर, नाशिक ग्रामीण पोलिस दलात ३२ रिक्त जागांसाठी भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून (ता.५) सुरू होत आहे. इच्छुक युवकांना आपला अर्ज भरण्यासाठी policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. तसेच या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती दिलेली आहे.
अवश्य वाचा : आमिर खानच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण;’महाराज’चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च
कोणत्या पदासाठी भरती (Police Recruitment)
गेल्या काही वर्षांपासून राज्यात मोठी पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत अर्ज प्रक्रिया सूरू केली आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज करू शकता,अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Police Recruitment)
या पोलीस भरतीमधील कोणत्याही पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४५०/- रूपये तर इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५०/- रूपये भरावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराची किमान मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व साधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा ही १८ ते २८ वर्षे आहे. आजपासून सूरू होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल.