Operation Muskan : जिल्हा पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान; ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा घेतला शोध

Operation Muskan : जिल्हा पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान; ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा घेतला शोध

0
Operation Muskan : जिल्हा पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान; ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा घेतला शोध
Operation Muskan : जिल्हा पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान; ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा घेतला शोध

Operation Muskan : नगर : राज्यातील बेपत्ता महिला व बालकांचा शोध (Search for Missing Women and Children) घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ऑपरेशन मुस्कान’ (Operation Muskan) या विशेष मोहिमेत नगर पोलिसांना (Police) मोठे यश मिळाले असून तब्बल ४५४ जणांचा शोध लावण्यात आला आहे. ही मोहीम ता. ६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आली.

नक्की वाचा : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

संपूर्ण राज्यात राबविण्यात आली मोहीम

ही मोहीम महाराष्ट्र पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात राबविण्यात आली. हरवलेल्या महिला व अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे, विशेष पथके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

४५४ बेपत्ता व्यक्तींचा शोध (Operation Muskan)

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातून एकूण ४५४ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ३९० महिला, ६० मुली आणि ४ मुलांचा समावेश आहे. शोधण्यात आलेल्या सर्व महिला व बालकांना आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले. मोहिमेच्या यशामागे प्रत्येक पोलीस ठाण्याने तयार केलेली विशेष पथके, गोपनीय माहिती संकलन, व्यावसायिक कौशल्याचा वापर आणि इतर जिल्ह्यांशी साधलेला समन्वय हे महत्त्वाचे घटक ठरले.