Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाथर्डीत तिरंगा यात्रा

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाथर्डीत तिरंगा यात्रा

0
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाथर्डीत तिरंगा यात्रा
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाथर्डीत तिरंगा यात्रा

Operation Sindoor : पाथर्डी: शहरात रविवारी भाजप (BJP) अहिल्यानगर (दक्षिण) व भाजप पाथर्डी पूर्व व पश्चिम मंडळाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) २७ भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर, भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) समर्थनार्थ तसेच त्यांच्या शौर्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात २ ‘जिहादी’ बनले व्हाईट हाऊसचे सल्लागार!

यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा

माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीतांचा गजर, “हम सेना के साथ हैं”, “ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. शहीद जवानांच्या स्मारकाला आणि थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी तिरंगा यात्रेवर फुलांची उधळण केली आणि मिठाई तसेच पाण्याचे वाटप करून स्वागत केले.

अवश्य वाचा : आमिर खानला बॉयकॉटची भीती!

नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग (Operation Sindoor)

यात्रेत आजी-माजी सैनिक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, महिला संघटना, युवक-युवती, तसेच तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तिरंगा यात्रा एकतेचे दर्शन घडवणारी ठरली. अजंठा चौकात राष्ट्रगीत गायन करून यात्रेचा समारोप करण्यात आला.