
Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर एक महत्वाचं पाऊल उचललं आहे.भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All-party delegation) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा सहभाग असणार आहे.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
केंद्र सरकारचे हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या ७ सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, श्रीकांत शिंंदे आणि सुप्रिया सुळेंना स्थान देण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
अवश्य वाचा : पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!
मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं ? (Operation Sindoor)
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करत म्हटलं की,”सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट आहे. दहशतवादाच्या विरोधातील आमचा सामायिक संदेश घेऊन ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील. राजकारणाच्या आणि मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचं हे एक शक्तिशाली प्रतिबिंब असेल”,असं त्यांनी म्हटलं आहे.
शिष्ट मंडळाची जबाबदारी कोणत्या नेत्यांवर असेल ? (Operation Sindoor)
१. शशी थरूर – अमेरिका
२. विजयंत जय पांडा – पूर्व युरोप
३. कनिमोझी – रशिया
४. संजय झा – आग्नेय आशिया
५. रविशंकर प्रसाद – मध्य पूर्व
६. सुप्रिया सुळे – पश्चिम आशिया
७. श्रीकांत शिंदे – आफ्रिकन देश
भारताचा हा मजबूत संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. माहितीनुसार, प्रत्येक शिष्टमंडळात ५ ते ६ खासदार असतील. हे शिष्टमंडळ अमेरिका, युनायटेड किंग्डम, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरात या सारख्या देशांना भेटी देतील. २२ मे नंतर हा परदेश दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.