
Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध (India vs Pakistan War) थांबलं असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मात्र भारत आता पाकिस्तानवर आकाशातून लक्ष ठेवून आहे. भारताचे १० उपग्रह सध्या पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,अशी माहिती इस्रोचे (ISRO) अध्यक्ष व्ही नारायणन (V Narayanan) यांनी एका कार्यक्रमातून दिली आहे. भारताच्या सीमारेषेतला प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची खात्री इस्रोच्या अध्यक्षांनी दिली आहे. केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
नक्की वाचा : ‘बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते’;शरद पवार यांचं भारत पाकिस्तान तणावादरम्यान वक्तव्य
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत किमान १०० दहशतवादी आणि पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मारले गेले. भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर २४ तासांनी तिन्ही सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चार दिवस चाललेल्या मोहिमेची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबले असले तरी भारताकडून पाकिस्तानवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
अवश्य वाचा : कलाविश्वावर शोककळा!मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन
इस्रोच्या अध्यक्षांनी काय सांगितलं? (Operation Sindoor)
एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबलं असल्याची घोषणा झाल्यानंतर ही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे दिसले.ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच असून पाकिस्तानकडून हल्ला झाला तर भारताकडूनही प्रत्युत्तर दिले जाईल,असे सांगण्यात आले आहे. भारताचे दहा उपग्रह सध्या भारताच्या सागरी सुरक्ष व सीमा सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. त्याशिवाय भारताच्या सागरी किनाऱ्यावरही आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. यासाठी उपग्रह किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी शिवाय हे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितलं.
१० उपग्रह सतत चोवीस तास कार्यरत राहणार (Operation Sindoor)
नारायणन पुढे म्हणाले की, ‘देशातील नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने किमान १० उपग्रह सतत चोवीस तास कार्यरत आहेत. तुम्हाला सर्वांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. जर आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या ७००० किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागेल. संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही,असं त्यांनी सांगितले.