नगर : राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. कुठे जोरदार तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान,आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Maharashtra Weather)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार
विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Maharashtra Weather)
दरम्यान, आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.