Organ Donation : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’

Organ Donation : 'ती' च्या अवयवदानातून तिघांना 'पुनर्जन्म'

0
Organ Donation : 'ती' च्या अवयवदानातून तिघांना 'पुनर्जन्म'
Organ Donation : 'ती' च्या अवयवदानातून तिघांना 'पुनर्जन्म'

Organ Donation : पारनेर : तालुक्यातील वडूले येथील रेश्मा योगेश भापकर (वय २५) लवकरच होणाऱ्या बाळाची उत्सुकतेने वाट पाहत होती. त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याने भापकर आणि औटी कुटुंबात आनंदी वातावरण होते. मात्र, दुचाकीच्या मागे बसून प्रवास करत असताना तिचा नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथे अपघात झाला आणि तिच्या मेंदूला गंभीर जखम (Serious Brain Injury) झाली. स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दाखल झाल्यानंतर तिने गोंडस मुलाला जन्म दिला. तिला पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण तीला ब्रेनडेड (Brain Dead) घोषीत करण्यात आले. त्यानंतर तिने केलेल्या अवयवदानातून (Organ Donation) आणखी तिघांना पुनर्जन्म मिळाला.

डॉक्टरांनी तिला केले होते ब्रेनडेड घोषित (Organ Donation)

या गर्भवतीचा नारायणगव्हाण (ता.पारनेर) येथे अपघात झाल्यानंतर तिला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने बाळाला जन्मही दिला. तिच्या बाळाने डोळे उघडले पण आईचे मात्र डोळे उघडत नव्हते. पुढे तिला पिंपरी चिंचवड येथील रुग्णालायात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मेंदूची शस्त्रक्रिया केली. प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या अवस्थेत फक्त मेंदूचे कार्य थांबले असले तरी संपूर्ण शरीराचे कार्य सुरू असते. अशा दुःखद प्रसंगी पती योगेश बबन भापकर, सासरे बबन नामदेव भापकर, सासू मंदा बबन भापकर, वडील सिताराम औटी, आई संगीता सिताराम औटी, मामा विष्णू कंद यांनी तिचे अवयव दान करण्याची संमती दिली. त्यानंतर तिचे अवयव दान करण्यात आले, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.