Outstanding Youth Award : शब्दगंधचा ‘उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार’ ऋषिकेश राऊत यास जाहीर

Outstanding Youth Award : शब्दगंधचा 'उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार' ऋषिकेश राऊत यास जाहीर

0
Outstanding Youth Award : शब्दगंधचा 'उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार' ऋषिकेश राऊत यास जाहीर
Outstanding Youth Award : शब्दगंधचा 'उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार' ऋषिकेश राऊत यास जाहीर

Outstanding Youth Award : अहिल्यानगर :– येथील बी. आर. पब्लिसिटी अँड इव्हेंट मॅनेजमेंट चे ऋषिकेश भगवान राऊत यांना यावेळीचा शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या (Shabdgandh Literary Conference) वतीने देण्यात येणार ‘उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार’ (Outstanding Youth Award) जाहीर झाला असल्याची माहिती शब्दगंधचे संस्थापक, सचिव सुनिल गोसावी यांनी दिली.

नक्की वाचा : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार करण्यात येणार प्रदान

या पुरस्काराचे वितरण रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहोर रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित १६ व्या शब्दगंध साहित्यिक संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने संमेलनाच्या नियोजना बाबतची बैठक नुकतीच संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शब्दगंधच्या स्वाती ठुबे, राजेंद्र पवार, बबनराव गिरी, राजेंद्र चोभे, शर्मिला गोसावी, प्रशांत सूर्यवंशी, मारुती सावंत, पत्रकार मकरंद घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’; शिवराज राक्षेचं वक्तव्य

अनेक वर्षांपासून संमेलनाचे आयोजन (Outstanding Youth Award)

राऊत हे गेल्या १० वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत असून मुंबई, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड सारख्या शहरांमध्ये काम करत आहे. त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात २०१५ साली इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा केला असून पुणे येथील नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम केले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून शब्दगंध साहित्यिक संमेलनाच्या आयोजन, नियोजन, पब्लिसिटी, फोटोग्राफी या कामामध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल मा. आ. लहू कानडे, आ. संग्राम भैय्या जगताप, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक, सचिव सुनिल गोसावी, खजिनदार भगवान राऊत, शर्मिला गोसावी, दिशा गोसावी, निखिल गिरी यांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. यावेळी नवजीवन प्रतिष्ठानच्या वतीने सर्व युवा कार्यकर्त्यांना डायऱ्यांचे वितरण करण्यात आले. शेवटी कवी मारूती सावंत यांनी आभार मानले.