नगर : नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोमवारी (ता.२८) संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे (Padma Awards) वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडप याठिकाणी आयोजित कार्यक्रमात २०२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या ४ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि ५७ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ७१ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज उपस्थित होते.
नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार
राज्यातील ९ मान्यवरांना पुरस्कार प्रदान (Padma Awards)
प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील ९ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि दोनवेळचा ऑलिम्पिक पदकविजेता हॉकीपटू पीआर श्रीजेश यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते. हे दोघेही या पुरस्कारासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट;कांद्याच्या दरात मोठी घसरण
कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान (Padma Awards)
मल्याळम लेखक-दिग्दर्शक आणि साहित्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एम टी. वासुदेवन नायर यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कर्नाटकातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायिका के.ओमानकुट्टी अम्मा, जसपिंदर नरुला, गायक श्री जोयनाचरण बाथरी, भेरू सिंह चौहान, रणेंद्र भानु मजूमदार, कर्नाटक सिनेइंडस्ट्रीतील स्टंट दिग्दर्शक हसन रघु यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.