Padmashri Rahibai Popere | अकोले आगाराकडून पद्मश्री राहीबाई पोपेरेंना खास भेट

आदिवासी विकास विभागाकडून विशेष प्रमाणपत्र

0

Padmashri Rahibai Popere: अकोले: देशी बियाण्यांच्या चळवळीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्याचे भूषण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना नुकतेच अकोले आगाराकडून एसटी पासचे वितरण करण्यात आले. आगारप्रमुख सुरेश दराडे यांच्या हस्ते या पासचे वितरण करण्यात आले. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना राज्य परिवहन मंडळाकडून अशा सवलती दिल्या जातात. या सवलतीचा लाभ आपल्या बीजमातेलाही व्हावा ही इच्छा येथील आगाराची होती. तिला मूर्त स्वरूप आगार व्यवस्थापक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे.

अवश्य वाचा-  संगमनेर तहसील कार्यालयाबाहेर लाचखोर लिपीक जेरबंद;  एसीबीची कारवाई

आदिवासी विकास विभागाकडून विशेष प्रमाणपत्र (Padmashri Rahibai Popere)

नुकत्याच छोटेखानी कार्यक्रमात या पासचे वितरण करण्यात आले. या पासचा उपयोग करून राज्य अंतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी राहीबाई यांना त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीला विना मोबदला प्रवास करता येणार आहे. या सुविधेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून त्यांना विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोफत पासची व्यवस्था करून देण्यात आल्याचे आगारप्रमुख दराडे यांनी जाहीर केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ लिपीक सचिन वाकचौरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक भापकर, आगार लेखाकार योगेश वाघमोडे, लिपीक अनिता दराडे, निशा गोंदके, योगिता राक्षे, कविता नागरे आदी उपस्थित होते.