Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा

Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा

0
Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा
Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा

Pahalgam Terror Attack : अहिल्यानगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानमध्ये (India-pakistan) राजकीय व लष्करी तणाव वाढला आहे. भारताने दहशतवादाविरोधात (Terrorism) जोरदार मोहीम हाती घेतली असून या लढाईला अमेरिकेनेही (America) पाठिंबा दर्शवला आहे. या लढाईसाठी अमेरिकेने भारताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अमेरिकेचे प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी दिले.

नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन

पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या बुधवारी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्ज राहण्याच्या उद्देशाने मॉक ड्रिल्स राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी भारताला एक अतिशय महत्त्वाचा भागीदार म्हणत पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा
Pahalgam Terror Attack : भारताच्या दहशतवादाविरोधातील मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा

अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

माइक जॉन्सन म्हणाले की, (Pahalgam Terror Attack)

भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भागीदार आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत पाठिंबा देण्यासाठी आम्ही भारताला सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. भारत अनेक दशकांपासून सीमापार होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. माइक जॉन्सन यांनी केलेल्या विधानामुळे भारत-अमेरिका राजनैतिक संबंधांना नवीन बळकटी मिळणार आहे. दहशतवाद विरोधातील लढाईत अमेरिकेचा पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे.