pailwaan Song : हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन कुस्ती (Wrestling) या खेळाचा उल्लेख अगदी रामायण, महाभारतात देखील आवर्जून केला जातो. कुस्तीच्या खेळातून भारतीय समाजात शौर्य, शिस्त आणि निष्ठा यांचे मूल्य रुजवले गेले आहे. अश्याच आपल्या तांबड्या मातीतल्या खेळावर आधारीत बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणे (Pailwaan Song) प्रदर्शित झाले आहे. नुकताच या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात (Pune) थाटामाटात पार पडला.
नक्की वाचा : अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ चित्रपट’या’ दिवशी होणार प्रदर्शित
मनीष महाजन यांनी केले ‘पैलवान’ गाण्याचे दिग्दर्शन (Pailwaan Song)
‘पैलवान’ हे गाणं भावनिक, रोमांचक,प्रेरणादायी आहे. या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, ८२ वर्षीय ज्येष्ठ हिंद केसरी दीनानाथ सिंग, बालकलाकार शंभू आणि आयुष काळे झळकले आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. तर या गाण्याची गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मनीष महाजन याने केलं असून गाण्याची निर्मिती हृतिक मनी आणि अनुष्का सोलवट यांनी केली आहे.
अवश्य वाचा : एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
या गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला क्रीडाविश्वातील ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू असलेले एम ओ वीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रदीप गंधे, एम ओ वीचे भारत तायक्वांदो-अध्यक्ष नामदेव शिरगावकर, ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू/रेफरी आणि एम ओ वीचे – रोइंग कार्यकारी मंडळ सदस्य स्मिता शिरोळे, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन खजिनदार ॲड.धनंजय भोसले, दिग्दर्शक अभिजीत दानी आदी उपस्थित होते.
‘पैलवान’ गाण्याबद्दल अभिनेता अंकित मोहन काय म्हणाला ? (Pailwaan Song)
अभिनेता अंकित मोहन पैलवान गाण्याविषयी सांगतो, “मला असं वाटतं माझ्या नशिबातचं पैलवानाची भूमिका करणं होतं. मी बिग हिट मीडियाचे आभार मानतो. की त्यांनी मला पैलवान गाण्यात काम करण्याची संधी दिली. सेटवर सर्व कुस्तीपटूंसोबत शूट करताना एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. “गाण्याचं शूट ५ दिवस पुण्यात होतं. रेड अलर्ट असतानाही आम्ही तिथे शूट केलं. निसर्गाचा चमत्कार म्हणजे आम्ही इन डोअर शूट करताना पाऊस पडत होता आणि आऊट डोअर शूट करताना २ दिवस सलग ऊन होतं. मला वाटतं देवाच्या मनात हे गाणं संपूर्ण शूट व्हावं असं होतं. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता हे गाणं लोकांच्या मनावर अधिराज्य करेल हे निश्चित आहे.”