Pais Khamb : माऊली मंदिरात ‘विठ्ठलनामा’चा गजर

Pais Khamb : माऊली मंदिरात 'विठ्ठलनामा'चा गजर

0
Pais Khamb : माऊली मंदिरात 'विठ्ठलनामा'चा गजर
Pais Khamb : माऊली मंदिरात 'विठ्ठलनामा'चा गजर

Pais Khamb : नेवासा: आषाढी शुद्ध एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची (Sant Dnyaneshwar Maharaj) कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील माऊलींच्या ‘पैस’खांबाचे (Pais Khamb) हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भक्तांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम” या नामघोषासह विठ्ठलनामा”च्या गजराने परिसर दुमदुमला होता.

नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त

पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ

आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या ‘पैस’खांबास वेदमंत्राच्या जयघोषात नाशिकहून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेल्या भाविकांच्या हस्ते चमेली चंदन उटीसह पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. एकादशी निमित्त पहाटेपासूनच येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून सेवेकरी गोरख भराट,सुरेश ढोकणे, वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावून विशेष सेवा दिली.

अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मंदिर प्रांगण गर्दीने गेले फुलून (Pais Khamb)

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात नेवासा शहरातील करविनी निवासिनी ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येत टाळ वाजवून “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा नामघोष करत भक्तीत तल्लीन होऊन रिंगण सादर केले. शुद्ध वारी निमित्ताने पंचक्रोशीतील क्षेत्रामधून ही अनेक दिंड्यांनी नेवासा येथे हजेरी लावली. मंदिर प्रांगणात विविध प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती. त्यामुळे मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. नेवासे शहरातील संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर ही देवालये ही भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. भाविकांच्या गर्दीने नेवासा शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकादशी उत्सवाचे औचित्य साधून नेवासा येथील वकील मंडळींनी देखील ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंत दिंडी काढली होती. या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.