Pakistan : अहिल्यानगर : वेगळ्या बलुचिस्तानच्या (Baluchistan) मागणीसाठी कार्यरत असलेल्या बलूच बिलरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये (Pakistan) जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली आहे. यावेळी झालेल्या चकमकीत ६ पाकिस्तानी जवानांचीही बलूच लिबरेशन आर्मीकडून हत्या करण्यात आली आहे. या ट्रेनमधील प्रवाशांना ओलीस ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
लष्करी कारवाई केल्यास प्रवाशांना ठार करण्याची धमकी
जाफर एक्सप्रेस या ट्रेनमध्ये ४५० हून अधिक प्रवासी आहेत. आमच्याविरोधात कोणतीही लष्करी कारवाई केल्यास सगळ्या प्रवाशांना ठार करु, अशी थेट धमकी बलूच बिलरेशन आर्मीने दिली आहे. ‘बोलानच्या मस्काफ परिसरात जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला गेला. या हल्ल्यात ट्रेनचा चालकही जखमी झाला आहे. यावर कारवाई करण्यासाठी सैन्याला पाठविण्यात आले आहे, परंतु हा संपूर्ण परिसर डोंगराळ असल्याने सुरक्षा दलांचे पोहोचण्यात अडथळे येत आहेत. अशी माहिती पाकिस्तान प्रशासनाने दिली आहे.

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
जाफर एक्स्प्रेस एका बोगद्यात असताना हल्ला (Pakistan)
जाफर एक्स्प्रेस एका बोगद्यात असताना हल्ला झाला. ट्रेन सकाळी ९ वाजता क्वेटाहून रवाना झाली होती. ही ट्रेन बोगदा क्रमांक ८ मध्ये शिरताच रुळांवर स्फोट झाला. त्यामुळे ट्रेन थांबली. यानंतर हल्लेखोरांनी ट्रेनच्या इंजिनावर गोळीबार केला. त्यात चालक जखमी झाला.
कोणतीही लष्करी कारवाई केल्यास सगळ्यांना संपवू, अशी थेट धमकी बलूच बिलरेशन आर्मी कडून देण्यात आली आहे. बलुचिस्तान प्रांतात प्रचंड खदखद आहे. हा भाग पाकिस्तान सरकारविरोधी आहे. सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आल्यानं इथल्या लोकांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे.