Pakistan : संयुक्त राष्ट्राच्या ‘दहशतवादी विरोधी समिती’च्या उपाध्यक्षपदी पाकिस्तान

Pakistan

0
Pakistan : संयुक्त राष्ट्राच्या 'दहशतवादी विरोधी समिती'च्या उपाध्यक्षपदी पाकिस्तान
Pakistan : संयुक्त राष्ट्राच्या 'दहशतवादी विरोधी समिती'च्या उपाध्यक्षपदी पाकिस्तान

Pakistan : नगर : दहशतवादाला (Terrorism) आपले हत्यार बनवणारा व प्रोत्साहन देणारा देश कोणता? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. तरीही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी पाकिस्तनाची (Pakistan) निवड झाली आहे. यूएनएससीच्या तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली. ही समिती अफगाणिस्तानच्या शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसाठी धोका मानल्या जाणाऱ्या व्यक्ती, गट आणि संस्थांच्या आर्थिक मालमत्ता गोठवणे, प्रवास आणि शस्त्रास्त्रांवर बंदी घालणे, याबाबतचे निर्णय घेणार आहे.

नक्की वाचा :मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य  

चीनचे समर्थन मिळाले असण्याची शक्यता

पाकिस्तानला हे पद मिळणे विवादास्पद ठरले आहे. कारण भारतासह अनेक देशांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप केला आहे. जे देश नागरिक आणि दहशतवादी यांच्यात फरक करत नाहीत, त्यांना अशा चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार नाही, असं म्हणत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत नुकतेच पाकिस्तानवर टीका केली होती. तरीही हे निवड करण्यात आली आहे. यासाठी पाकिस्तानला काही देशांचे समर्थन मिळाले असण्याची शक्यता आहे, विशेषत: चीनसारख्या स्थायी सदस्यांचे, ज्यांच्याशी पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत

Pakistan : संयुक्त राष्ट्राच्या 'दहशतवादी विरोधी समिती'च्या उपाध्यक्षपदी पाकिस्तान
Pakistan : संयुक्त राष्ट्राच्या ‘दहशतवादी विरोधी समिती’च्या उपाध्यक्षपदी पाकिस्तान

अवश्य वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो

निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी (Pakistan)

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. त्यामध्ये 5 स्थायी सदस्य (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम) आणि 10 अस्थायी सदस्य असतात. अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी होते. 2025 मध्ये पाकिस्तान अस्थायी सदस्य म्हणून सुरक्षा परिषदेत सामील झाला आहे. त्यामुळे त्यांना परिषदेच्या विविध समित्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.